ऊस शेती

खोडव्याचे व्यवस्थापन कसे कराल?


पाचट कुट्टी करून पाचट सरी मध्ये दाबून घ्या. त्यानंतर धारदार कुदळी च्या सहाय्याने बुडखे छाटून घ्या. बुडखे छाटत असताना जमिनी खाली एक इंच खोल तासलणी करून घ्या. म्हणजे खालून येणारा ऊसाचा कोंब जाडजूड निघेल.बुडखे छाटून झाल्यानंतर छाटलेल्या बुडाख्या वरती बुरशीनाशक व कीटकनाशकचा स्प्रे घ्या. त्यासाठी बाविस्टीन १ लिटर ला १ग्रॅम व मॅलिथिऑन लिटरला ३ मिली या प्रमाणात मिसळून स्प्रे घ्या. बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची फवारणी छाटलेल्या बुडख्यांवर केल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा व कीटक रोगांचा बंदोबस्त होतो.

पाचटा कुजविण्यासासाठी पाचटा वरती प्रति एकरी ५० किलो युरिया व १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू सेंद्रिय खतामध्ये अथवा ओलसर मातीमध्ये किंवा शेणखता मध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे.किंवा एकरीं १लिटर द्रवरूप पाचट कुजविणारे जिवाणू शेणखत/सेंद्रिय खता मध्ये मिसळून टाकावे. तसेच शक्य असेल तर कारखान्याचे प्रेसमड पासून तयार केलेले सेंद्रिय खत एकरीं ५ते७टन किंवा शेणखत पाचटा वरती टाकलेस त्याचे चांगले परिणाम दिसून येतात.

त्यानंतर सरी मध्ये दाबलेल्या पाचटा वरती पहाटे ट्रॅक्टर फिरवून घ्या. सकाळच्या वातावरणात पाचट मऊ पडलेले असते व त्या वरती ट्रॅक्टर फिरवल्याने पाचट चोपून बसते. पाचट चोपून बसल्याने बगला मारल्यानंतर सर्व पाचट मातीआड होते.

४.५फूट सरी असेल तर बैलाच्या नांगरीने वरंब्याच्या दोन्ही बाजूने बगला मारून घ्या.५फुटाच्या वरती सरी असतील तर ट्रॅक्टरच्या नांगरीने बगला मारून घ्या.बगला फोडल्याने जुनी मुळी तुटून नवीन मुळांच्या संख्येत चांगली वाढ होते.ही मुळे फारच कार्यक्षम असतात. बगला फोडल्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते.बगला फोडत असताना जर जमीन एकदम कडक झाली असेल तर एक पाणी देऊन बगला फोडून घ्याव्यात.

वरंब्याच्या दोन्ही बाजूनी बगला मारल्याने संपूर्ण पाचट मातीआड होते.व २.५/३महिन्या मध्ये पाचट कुजून जाते.पाचट कुजल्यानंतर कडक उन्हामध्ये पॉवर टिलर दोनदा रिवर्स मारून घेतले असता.संपूर्ण पाचट मिश्रित मातीची भर वरंब्याला लागते. दोन्ही बाजूनी बगला फोडल्याने वरंबा एकदम लहान झालेला असतो तो भर लावल्यानंतर पूर्वीसारखा वरंबा तयार होतो.

पाचट कुजविल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून उपयुक्त जिवाणूंची वाढ होते.ऊसाच्या उत्पादना मध्ये वाढ होते.

पाचट कुट्टी करून दोन्ही बाजूनी बगला मारून घेतल्या नंतर १डोस देत असताना वरंब्याच्या एका बाजूला रासायनिक खतांचा डोस द्यायचा आहे व दुसऱ्या बाजूला सुक्ष्मअन्नद्रवे द्यायचे आहेत. खालील प्रमाणे खते वापरा.सर्व प्रमाण
एकरी आहे.


बगला मारल्या नंतर१ला डोस
२बॅग dap
२बॅग युरीया
१बॅग पोटॅश
८किलो फरटेरा

वरंब्याच्या दुसऱ्या बाजूला सुक्ष्मअन्नद्रवे खालील प्रमाणे द्या.

१)झिंक सल्फेट:-१०किलो
२)फेरस सल्फेट:-१०किलो
३)मँगनीज:- ५ किलो
४)मैग्नेशियम सल्फेट:-२५किलो
५)बोरॉन:-३किलो
६)गंधक:-१०किलो
७)सिलिकॉन पावडर:-८०किलो
वरील सर्व सुक्ष्म अन्नद्रवे २५०किलो चाळलेले शेणखत किंवा प्रेसमड पासून तयार केलेले कंपोष्ट खत किंवा कोणत्याही सेंद्रिय खता मध्ये ८/१० दिवस मिसळून ठेवा, त्यांनंतर सरी मध्ये मातीआड करून टाका. शेणखत , कंपोस्ट खत, किंवा सेंद्रिय खता मध्ये सूक्ष्मअन्नद्रवे मिसळल्याने चिलेटेड फार्म तयार होऊन पिकांना चांगल्या प्रकारे उपलब्ध होते.


१ले पाणी दिल्यानंतर १ली आळवणी

फवारणी व आळवणी शेड्युल

-★मास्टर किट वापरण्याची पद्धती★

मास्टर लाईफ २५० ग्रॅम + मास्टर रुट ५००
मिली+युरीया ६ किलो २०० ते ४००लिटर पाणी


★पहिली आळवणी केल्यानंतर २५ते३०दिवसानंतर दुसरी आळवणी

मास्टर लाईफ २५० ग्रॅम + मास्टर रुट ५००मिली + युरिया ६किलो २००ते ४००लिटर पाणी

खोडवा व्यवस्थापन

शेतीनिष्ठ श्री सुरेश कबाडे.*
प्रबंधक, होय आम्ही शेतकरी समूह,
संचालक गन्नामास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड
रा.कारंदवाडी ता:-वाळवा जि:-सांगली