इतर

ई एम सोल्युशन वापरण्याची पध्द्त,घटक व फायदा

१ लि मेपल ईएम हरियाली + १.५ किलो गुळ + १८लि पाणी =२० लिटर ई एम

वरील द्रावण एका हवाबंद प्लास्टिक कॉन मध्ये पाच दिवस ठेवावे. दर २४ तासानी त्यातील गॅस काढा . नंतर वरीलपैकी १० लिटर द्रावण एकरी 2 वेळेस 10 दिवसाच्या अंतराने वापरा.

वापर :-

जमिनीतून देण्यासाठी (Soil )

२०लिटर एकरी २००लिटर पाण्यातून देणं

वापरण्याआधी एक ३ दिवस आधी व ४ दिवस नंतर कोणतेही केमिकल देऊ नका.( वॉटर सोलेबल चालतील )

Spray

१० मिली प्रति लिटर पाणी

फायदा :-

१.जमिनीतील परिणामकारक जिवाणु हजारो पटीने वाढतात.
२.झाडाची फुले निघण्याची क्षमता वाढते.
३.जमिनीती स्थिर अन्नद्रवाचे विघटन होते.
४.जास्त पाण्यामुळे जाम झालेल्या मुळया मोकळया होतात.
५. जमिनीतील गाडुळ संख्या वाढते.
६.जमिनीचा सामु सुधरतो
७.झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
८.पिकाच्या उत्पादन व प्रती मध्ये भरघोस वाढ.
९.रासायनिक खत मात्रेच्या वापरात बचत होते.

EM सोल्युशनमधे हे घटक प्रामुख्याने असतातच
– photosynthetic bacteria (प्रकाश संश्लेषक जीवाणू),
– Lactobacillus किंवा lactic acid bacteria,
– yeasts (यीस्ट)

photosynthetic bacteria किंवा प्रकाश संश्लेषक जीवाणू – हे जीवाणू सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वत:चे अन्न निर्मिती करतात. पिकांच्या मुळातून निघणारे विविध स्त्राव, जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अंश व वातावरणातील अमोनिया यांपासून अमीनो ऍसीड, न्यूक्लिक ऍसीड्सची व शर्करेची (साखर) निर्मिति करतात. जे पिकाच्या मुळ्यांना तयार स्वरूपात सहजगत्या उपलब्ध होउन जलदगतीने पोषण व वाढ होण्यास मदत होते. याव्यतिरीक्त जमीनीतील विविध प्रकारच्या जीवाणू व नत्राणू वाढीस प्रोत्साहन मिळते.
Lactobacillus किंवा lactic acid bacteria – हे जीवाणू कार्बोहायड्रेट्स व शर्करेचे रूपांतर lactic acid मधे करतात. यातील अंगभूत निर्जंतुकीकरण गुणधर्मामुळे जमीनीतील नेमेटोड्सच्या वाढीवर नियंत्रण होते. जमीनीतील विविध सेंद्रीय घटकांचे विघटन घडवण्यात या जीवाणूंचा खूप मोठा सहभाग असतो.
yeasts (यीस्ट) – वनस्पतीच्या पेशीविभाजन व मुळांच्या वाढीसाठी आवश्यक हार्मोन्स व एंझाइमचि निर्मिती करण्याचे काम यीस्टमुळे होते. यीस्ट प्रकाश संश्लेषक जीवाणूंनी तयार केलेल्या शर्करा व अमीनो ऍसीडचा वापर करून lactic acid bacteria वाढीसाठी पूरक द्रव्ये बनवतात.
अशाप्रकारे EM सोल्युशन मधील विविध प्रकारचे जीवाणू एकमेकांना पूरक व सहायभूत परीस्थिती निर्माण करून पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्न्द्रव्ये, सूक्ष्मद्रव्ये व एंझाइम्सची निर्मिती करतात.