ऊस शेती

उसाला ठिबक सिंचन का हवे?

ठिबक सिचंन म्हणजे उसाच्या मुळयांशी थेंब थेंब पद्धतीने पाणी देणे. यामध्ये जमीन, हवामान, पाणी या सर्वांचा अभ्यास
करून कमी दाबाने व नियमन करून मुळांच्या सान्निध्यात एकसारखे पाणी दिले जाते. या पद्धतीमध्ये जमिनीत पाणी
जिरण्याचा जाे वेग असतो त्यापेक्षा कमी वेगाने पाणी मुळांच्या सान्निध्यात दिले जाते.
ठिबक सिंचन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
१) जमिनीत सतत वाफसा राहतो. उसाची वाढ चांगली होते.
२) पाणी हे जमिनीस न देता ऊस पिकास दिले जाते.
३) जमिनीच्या मगदराप्रमाणे दररोज क ू िं वा एकदिवसाआड पाणी दिले जाते.
४) ऊसाच्या गरजेप्रमाणे कमीतकमी वेगाने पाणी दिले जाते.
५) हवा व पाणी यांचा चांगला समन्वय होऊन मुळाशीच पाणी दिले जाते

ठिबक सिंचनाचे फायदे :
१) उपलब्ध पाण्यामध्ये पाटपाण्याच्या पद्धतीपेक्षा दप्पट क् ु षेत्र भिजते.
२) थोडेसे क्षारयुक्त पाणीसुद्धा प्रभावीपणे वापरता येते.
३) सर्व रोपांना समान पाणी मिळून वाफसा टिकू न राहतो.
४) कांड्यांची संख्या, लांबी, जाडी चांगली व एकसारखी राहते.
५) फु टव्यांची संख्या चांगली राहते.
६) उंच सखल, पडीक जमिनी लागवडीखाली आणता येतात. हलक्या व रेताड जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त.
७) जमिनीची धूप टळते. प्रत चांगली राहते. मशागत कमी करावी लागते. खतांचा अपव्यय टळतो.
८) पिकाच्या गरजेनुसार खते विभागून दिली जातात.
९) पाणी फक्त मुळाच्या क्षेत्रात राहते. इतर भाग कोरडा राहतो. तण वाढत नाही.
पिकाची अन्नासाठी व पाण्यासाठी स्पर्धा टळते.
१०) कीड व रोगांचा प्रादर्भाव कमी होतो.
११) पाणी देण्यासाठी मजुरीचा खर्च कमी येतो.
१२) संच रात्री किं वा दिवसा के व्हाही चालविता येतो.
या सर्व फायद्यांमुळे ठिबक सिचंन ही काळाची गरज आह